महापालिका सभेत नगरसेविकेने डोक्यात माईक मारून घेतला
सांगली : सांगली महापालिका अंदाजपत्रिका महासभेत गोंधळ झालाय. विकासकामाच्या फाईली प्रशासनाने अडवल्याचा विरोधात नगरसेवक आक्रमक झालेत. यावेळी सर्व नगरसेविका आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नगरसेविका सुरेखा कांबळे यांनी डोक्यात माईक मारुन घेतला. पुरुष आणि महिला नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी महिला नगरसेविकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महासभेत जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.