Sangli Accident: सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी इथं भीषण अपघातात (Accident) झाला. या अपघातात सात जण जागीत ठार झाले. रत्नागिरी - नागपूर महामार्गावर (Ratnagiri-Nagpur Highway) बोलेरो गाडी आणि ट्रॅक्टरची (Bolero-Tractor Accident) समोरा-समोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि 12 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. बोलेरो गाडीतील मृत हे सगळे कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील असल्याचं समोर आलें आहे. हे सर्व जण एकाच गाडीतून पंढरपूरकडे देवदर्शनासाठी निघाले होते. मिरज बायपास असणाऱ्या रत्नागिरी- नागपुर माहमार्गावरील वडडी गावाच्या हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोलरे गाडी पंढरपूरच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने बोलेरोला धडक दिली. विटाने भरलेला ट्रॅक्टर  अचानक समोर आला ,ज्यामध्ये भरधाव असणारी बलोरे गाडी समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. ज्यामध्ये गाडीचा चक्काचुर होऊन 7 जण जागीच ठार झाले. तर 1 तरुणी गंभीर जखमी झाली आहे. जखमी व्यक्तीला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  घटनास्थळी मिरज पोलीस दाखल झाले असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून अपघातात चूक कोणाची होती याचा तपास सुरु करण्यात आला आहे. यासाठी परिसरारातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली जाणार आहे.


ब्रेक फेल झाल्याने अपघात
दरम्यान नालासोपारात भरधवा वेगाने जाणारा टँकर थेट बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयात घुसला. नालासोपारा पूर्वेच्या तुळींज रोड इथं आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. मात्र मोठी वित्तहानी झाली.संतोष भुवन वरून पाण्याचा एक टँकर नालासोपाराच्या दिशेने येत होता. मात्र अचानक या टँकरचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचं नियंत्रण सुटलं. रस्त्यावरील पादचाऱ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात हा टँकर थेट तुळींज रोडवरील बहुजन विकास आघाडीच्या कार्यालयातच शिरला. हे कार्यालय बहुजन विकास आघाडीचे नेते अमित वैद्य यांचे आहे. 


या टँकरचा वेग एवढा प्रचंड होता की थेट दरवाजा तोडून तो कार्यालयात शिरला. यावेळी कार्यालयात एक महिला सफाई कर्मचारी होती. मात्र ती या घटनेतून बचावली टॅंकर चालकालाही किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे रोड परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.