सांगली : सांगलीच्या हळदीला सामुहिक पेटंट मिळलं असून प्राध्यापक गणेश हिंगमिरे यांच्या पाठपुराव्याला यश आलंय. या पेटंटमुळे सांगली जिल्ह्यातील हळद घेणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सांगलीच्या हळदीला भौतिक संपदेचा दर्जा मिळाला असून यासंदर्भातल प्रमाणपत्र लवकर मिळणार आहे. सांगली हे देशातील प्रमुख हळद वायदे बाजाराचे ठिकाण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शंभर वर्षांपासून हरिपूरच्या पेवां जमिनीत हळद साठवली जातंय. चिकट गाळमातीचे वैशिष्टे लाभलेल्या हरीपुरातील पेवांमध्ये हळद तीन वर्षापर्यंत सुरक्षित राहाते. प्राणवायू अभावी या ठिकाणी हळदीला कीड लागू शकत नाही. त्याशिवाय हळदीचे वजन वाढून त्याचा रंगही खुलतो. या ठिकाणी हळदीची गुणवत्ता चांगली रहाते. त्यामुळेच साठवणुकीच्या इतर प्रकारांमध्ये पेवाना अधिक मागणी असते.


हिंगमिरे यांनी २०१३ ला हळदीला पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्या अर्जाला विरोध झाला होता. पेटंट मिळवण्यासाठी वैज्ञानिक आधार गरजेचा होता. अखेर सर्व गोष्टींची पुर्तता झाल्यानंतर अखेर जवळपास ५ वर्षांनंतर सांगलीची हळदीला सामुहिक पेटंट मिळवण्यात यश आलंय.