COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली : 'मिसेस इंडिया वर्ल्ड २०१८' चा किताब मिळवणाऱ्या वैशाली पवारचं सांगलीत उत्साहात स्वागत करण्यात आलं. 30 मे 2018 रोजी दिल्लीत झालेल्या  ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेत तिनं हा मानाचा मुकुट पटकावला. त्यानंतर ती तिच्या घरी सांगलीत परतली. वैशाली पवार ही मूळची सांगलीची आहे....  ग. रा. पुरोहित शाळेत तिचं शिक्षण झालं तर  कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात तिनं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. मुंबईतल्या व्हीजेटीआयमधून पदव्युत्तर पदवी तर अमेरिकेत जॉर्ज वाशिंग्टन विद्यापीठात प्रकल्प व्यवस्थापनाचं तिनं प्रशिक्षण घेतलं.


लक्ष्य ‘मिसेस वर्ल्ड’


सध्या ती बंगळुरूमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.  नऊ स्वयंसेवी संस्थाबरोबर त्या शासकीय शाळा, स्थलांतरीत मुले, अनाथआश्रम, पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण, रक्त संकलन अशा विविध सामाजिक विषयांत तिचा सहभाग असतो. मूळची सांगलीकर आणि कर्नाटकची सून झालेल्या वैशालीची नुकतीच नवी दिल्लीतील ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेसाठी निवड झाली होती. मिसेस इंडिया’ सौंदर्य स्पर्धेचा मुकुट पटकावल्यानंतर, वैशालीच आता पुढचे लक्ष्य ‘मिसेस वर्ल्ड’ आहे. डिसेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी ती तयारी करत आहे.