सांगली : मुंबईतील सायन रुग्णालयाकडून दिलेला मृत व्यक्तीचा अहवाल चुकीचा असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. मुंबईत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या व्यक्तीवर खेराडी वांगीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, 'ती' मृत व्यक्ती कोरोना पोझेटिव्ह नव्हतीच. मात्र त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाल्यावर, सायन हॉस्पिटलकडून ती पॉझिटिव्ह असल्याचे कळवल होते. सायन रुग्णालयाकडून आता मात्र ती व्यक्ती कोरोना बाधित नव्हती अस सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायन रुग्णालयाच्या चुकीमुळे सांगली जिल्ह्याला विनाकारण त्रास सहन करावा लागला. खेराडे वांगी गावात भीतीच वातावरण पसरले होत आणि आरोग्य, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यंत्रणा सुद्धा राबवली गेली. मुंबईमध्ये मृत झालेल्या व्यक्तीवर खेराडी वांगीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते, अंत्यसंस्कार झाल्यावर दोन दिवसांनी सायन हॉस्पिटलकडून ती व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याबाबत सांगली जिल्हा प्रशासनाला सांगण्यात आले होते. त्यांनतर सर्व यंत्रणा वेगाने कार्यरत झाली.


या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना आजाराने झालेला नव्हता असे अहवालात स्पष्ट केले आहे. तसा अहवाल सायन रुग्णालयानेच दिला आहे. मात्र या बाबत यापूर्वी जिल्हा प्रशासनाने अधिकची खबरदारी म्हणून संबंधित व्यक्तीच्या ज्या ३६ निकटवर्तीयांना कडेगाव येथे इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन केले होते, खेराडी वांगीत हे गाव सील करण्यात आले होते. संपूर्ण आरोग्य, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची यंत्रणा चांगलीच कामाला लागली होती.


सायन रुग्णालायने पाठवलेल्या त्या रुग्णाच्या रिपोर्ट बाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. याबाबतच वृत्त सर्वात आधी 'झी २४ तास' वरुन प्रसारित करण्यात आले होते, आता तर लेखी अहवाल देऊन सायन रुग्णालायने सुद्धा ती व्यक्ती पॉझिटिव्ह नव्हती हे स्पष्ट केले आहे.