पोहरादेवी : वनमंत्री संजय राठोड (Sanjar Rathod Reached Poharadevi Temple)  अखेर पोहरादेवीत दाखल झाले आहे. याठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ गडावर हजारो कार्यकर्ते दाखल होते. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी समर्थकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले आणि संजय राठोड यांचं जल्लोषात स्वागत केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी झालेल्या आरोपांबाबत वनमंत्री संजय राठोड चौकशीला सामोरं जातील असे संकेत मिळत आहेत. राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी संस्थानने केली आहे. महंत जितेंद्र महाराज यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे. त्यामुळे राठोड आता चौकशीला सामोरं जातात का याची उत्सुकता आहे. 


संजय राठोड यांच्यावरील ईडापिडा टळू दे आणि त्यांच्यावरील संकट दूर होऊ दे यासाठी पोहरादेवी गडावर महंतांकडून होमहवन केलं जातं आहे. एवढंच नव्हे तर राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा झाली. पोहरादेवी गडावर संजय राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तसंच संत महंतांनी होमहवन सुरू केलं आहे.  वनमंत्री संजय राठोड यांची यवतमाळच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं? याकडे ही साऱ्यांचं लक्ष आहे.