अमर काणे, झी मीडिया, नागपूर : सध्या सगळीकडे चर्चा आहे ती संजय राऊत यांच्या बेलची. या एका बातमीनं संपुर्ण महाराष्ट्रात (Maharshtra Politics) ठिणगी पेटवली आहे. ही बातमी इतकी जोरदार वेगानं फिरतेय की संजय राऊतांच्या समर्थकांनी जगभर जल्लोष करायला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभुमीवर काही (latest Political Update) लोकांचा उत्साह इतका शिगेला गेला की अनेक जण जखमीही झाले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच हास्याचा फवारा उडाला आहे. अशाच काही समर्थकांचा (Followers) अतिउत्साह त्यांनाच नडला आहे. सध्या अशीच एक घटना नागपूर भागात घडली आहे. या घटनेनं सगळीकडेच हल्लाबोल झाला आहे. (sanjay raut followers hair and hand caught fire while dancing fire in his hand)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला. त्यामुळे तो एकच गोंधळला. यावेळी शेजारी असलेल्या इतर शिवसैनिकांनी त्या शिवसैनिकाच्या केसांना आणि हाताला आग लागल्याचे पाहून तत्परतेने त्याच्या डोक्यावरील आणि हातावरील आग विझवली. सुदैवानी यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली नाही. म्हाळगी नगर चौकात ढोल ताशांच्या तालावर शिवसैनिक नाचत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे सगळीकडेच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे आता उत्साही समर्थकांना त्यांचाच हा अतिउत्साह नडला आहे. 


100 दिवसांनंतर बेल :


पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patrachawal Scam) खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) कोर्टाने मोठा दिलासा आहे. 2 लाखांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) मागणी केली होती. पण ही मागणीही कोर्टाने फेटाळली. ईडीनं जामिनाच्या निर्णयाला विरोध केला होता. तब्बल 100 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना 31 जुलैला अटक करण्यात आली होती. 



आईचे डोळे पाणावले : 


ईडी (ED) चे अधिकारी राऊतांना ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या घरी पोहोचले होते,  त्यावेळी त्यांच्या आईचे डोळे पाणावले होते यावेळी घरातून निघण्यापूर्वी त्यांनी आईला(Sanjay Raut Mother) घट्ट मिठी मारत तिला धीर दिला होता, तिच्या पाया पडत आशीर्वादही घेतले होते.