`ज्यांचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो त्यांना..`, CM शिंदेवर टीका; म्हणाले, `तुमच्या मुलाच्या मतदारसंघात..`
CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या विधानाचा समाचार घेताना थेट त्यांचा खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंचा संदर्भ देत कठोर शब्दांमध्ये प्रश्न उपस्थित केले आहेत.
CM Eknath Shinde On Intention Of Badlapur School Case Protest: बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या चिमुकल्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मागील दोन दिवसांपासून बदलापूरमध्ये आंदोलन सुरु आहे. या प्रकरणामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष पाहायला मिळत आहे. बदलापूरमध्ये या प्रकरणावरुन हजारो लोक रस्त्यावर उतरल्याचं चित्र 20 ऑगस्ट रोजी पाहायला मिळालं. बदलापूरकरांनी अनेक तास मध्य रेल्वेची वाहतूक रोखून धरली. तसेच काही ठिकाणी बसची तोडफोडही झाली. या प्रकरणामध्ये सौम्य लाठीचार्ज झाल्यानंतर बुधवारपासून या प्रकरणी 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करुन धरपकड पोलिसांनी सुरु केली आहे.
बदलापूरमधील या आंदोलनामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन झालेली घोषणाबाजी, बॅनरबाजीचा संदर्भ देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सदर आंदोलनाला राजकीय फूस होती अशा आशयाचं विधान केलं आहे. हे आंदोलन इतक्या काळ कसं लांबलं? बॅनर कसे छापून आणले? यासारखे प्रश्न उपस्थित करत बदलापूरच्या बाहेरून माणसं आल्याची शक्यताही सत्ताधाऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणात विरोधकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यावरुनच प्रश्न विचारला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
अर्ध्या दिवस जादूटोण्यात...
मुख्यमंत्र्यांनी बदलापूर प्रकरणार राजकीय हेतू असल्याचा संशय व्यक्त केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी, "मुख्यमंत्री शिंदेंचा अर्धा दिवस जादूटोण्यात जातो" असं विधान केलं आहे. "त्यांनी आमच्यावर (विरोधकांवर) संशय व्यक्त केलाच पाहिजे. कारण या राज्याचे मुख्यमंत्री हा संशय आत्मा आहे. ज्यांचा अर्धा दिवस जादूटोणा, मंत्र-तंत्रामध्ये जातो त्यांना संशय येणारच! बदलापूरचे लाखो लोक रस्त्यावर उतरले तो सुद्धा जादूटोणा केला असेल असे त्यांना वाटेल," असं राऊत म्हणाले.
नक्की वाचा >> ''वर्षा'वर फाशी दिली की राजभवानावर?' संजय राऊतांचा CM शिंदेंना सवाल; 'बलात्कारी तर...'
शिंदेंच्या खासदार मुलाचा संदर्भ...
राऊत इतक्यावरच न थांबला बदलापूर हे मुख्यमंत्री शिंदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात येतं याचीही आठवण करुन दिली आहे. "तुमच्या मुलाच्या मतदारसंघात लाखो लोक रस्त्यावर उतरले. तुमचा मुलगा साधा त्यांना भेटायला सुद्धा गेला नाही. यात विरोधकांचा दोष आहे?" असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
नक्की वाचा >> 'त्याच्या बापाला पण...', निलेश राणेंवर राऊत संतापले! पवारांचा उल्लेख करत म्हणाले, 'फडणवीस तोंड...'
आंदोलक बाहेरचे होते हा दावा पोलिसांची रिमांट कॉपी पोस्ट करत खोडला
दुसरीकडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर आंदोलन प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आंदोलकांबद्दल सत्ताधारी करत असलेले दावे चुकीचे असल्याचं सांगताना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांसंदर्भातील पोलिसांची रिमांड कॉपीच शेअर केली आहेत. "बदलापूर प्रकरणी केलेले आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित होते, यातील आंदोलनकर्ते बदलापूरच्या बाहेरचे होते हा आरोप करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पोलिसांची रिमांड कॉपी बघावी. अटक केलेल्या सगळे आंदोलकांचे पत्ते बदलापूरचे आहे," असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.
"या सरकारला फक्त स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे, पण सरकारवर एखादा आरोप झाला की लगेच विरोधकांना दोष द्यायचा. स्वतः मात्र कोणत्याच घटनेची जबाबदारी घ्यायची नाही," असा टोला वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लागावला आहे.