Maharashta Politics : शिवसेनेतील (Shiv Sena) फुटीनंतर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) रोजच एकमेकांवर तुटून पडताना दिसतात. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सातत्याने शिंदे गटावर निशाणा साधत असतात. शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावर ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटाला लक्ष्य करण्यात आले आहे. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता कृषी मंत्री अब्दुल सत्तार (adbul sattar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हालाही याच्यापेक्षा वाईट शब्दात बोलता येतं असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनामानाट्यावरुन भाष्य करण्यात आले आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा त्यांचा 'प्लान' होता.  मिंधे गटाबरोबर आमदार-खासदार गेले, पण निवडणूक आयोगाने पक्ष त्यांना देऊनही त्यांचा तंबू रिकामाच राहिला आहे. शिवसेना सोडून जे गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षा वाईट आहे. त्यामुळे भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे, असे सामना अग्रलेखात म्हटलं होतं.


अब्दुल सत्तार यांचे प्रत्युत्तर


"आमच्या मतावर कुत्र्याला राज्यसभेवर पाठवलं आहे. कुत्र्याची अवस्था कशी झालेली आहे. रोज सकाळी उठतो आणि आमच्यावर भुकतो. त्याच्यापेक्षाही वाईट शब्दात आम्हाला बोलता येतं. परंतु एखाद्या कुत्र्याला आम्ही राज्यसभेमध्ये पाठवलं आहे. असे असून आम्हाला कुत्रा बोलत असतील तर त्यांच्यासारखा महाकुत्रा कोणताच नसेल. हिंमत असेल आणि माणसाची औलाद असेल तर त्यांनी राजीनामा देऊन परत निवडूण यावं. मी पण राजीनामा देतो त्यावेळ कळेल कोणाची औलाद आहे. मी सामना वाचतच नाही. त्यामध्ये वाचण्यासारखं काहीच नाही. सामना वाचून काही फायदा नाही. दुसऱ्याला जो कुत्रा बोलतो तो पहिला कुत्रा असतो. म्हणून कुत्रे त्याला दिसतात. अशी भाषा बोलणाऱ्यांनी जीभेला लगाम द्यावं आम्हालाही याच्यापेक्षा वाईट भाषेत बोलता येतं," असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.


असे कृषी मंत्री आम्ही पाहिले नाहीत अशी टीका केली जाते त्यावर अब्दुल सत्तार यांनी भाष्य केले आहे. "उद्धव ठाकरेंना सोडून येताना मी त्यांनी पाहिले नाही. माझ्या इतका कोणताच कृषिमंत्री फिरलेला नाही. त्यांचे दुखणं वेगळं आहे. ते कधीच बांधावर जात नाही. त्यांना बांध माहिती असता तर बांध फुटला नसता आणि 40 आमदार गेले नसते," असेही अब्दुल सत्तार म्हणाले.