पुणे : दौंडमध्ये जुगाराच्या वादातून अंदाधुंद गोळीबार करून तिघांची हत्या करणारा एसआरपीएफ जवान संजय शिंदे याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी संजय शिंदेला नगर जिल्ह्यातील सुपे भागातून अटक करण्यात आली. त्याला आज पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं. आरोपी सरकारी नोकर आहे, त्यानं निर्घृण पद्धतीनं हत्या केल्यात. या हत्यांमागचा उद्देश पोलिसांना तपासायचा आहे. केवळ जुगार आणि 10 हजार रूपयांसाठी हत्या केल्यात, असे वाटत नाही, असा युक्तिवाद पोलिसांच्या वतीनं न्यायालयात करण्यात आला. तपासासाठी वेळ हवा, अशी मागणीही त्यांनी केली. तेव्हा न्यायालयानं आरोपी संजय शिंदेला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.