मुंबई / पुणे : आषाढी वारीसाठी शुक्रवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे  (Sant Tukaram Maharaj Palkhi Prasthan) देहू इथून प्रस्थान झाले. कोरोनाचे संकट असल्याने परंपरागत पद्धतीने पण मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंगचं पालन करुन हा प्रस्थान सोहळा  झाला.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारीचा सोहळा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षाची परंपरा कोरोना संकटामुळे मोडीत निघाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आषाढी वारी  (Ashadhi Wari) वर कोरोना विषाणूचे (Coronavirus)  सावट असल्याने काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सुरु झाला आहे. आज  संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या प्रस्थान (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan) होणार आहे. यावेळीही काही मोजकेच वारकरी असणार आहेत.


शुक्रवारी औरंगाबादमधून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे देखील प्रस्थान झाले. पैठणमध्ये अवघ्या २० जणांना या सोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. पैठणमध्ये दिंडी सोहळा झाला. दरम्यान ही पालखी मंदिरामध्येच राहणार आहे. नाथवाड्यामध्ये हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे.