Santosh Deshmukh murder case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिकवर उपचार करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात वादात सापडलेत. अशोक थोरातांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असून त्यांना सेवेत का ठेवलंय असा सवाल अंजली दमानियांनी केलाय. डॉक्टर अशोक थोरातांनी संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्येही हेराफेरी केली असावी असा आरोपही करण्यात येतोय. वादात सापडलेले डॉक्टर अशोक थोरात कोण आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा कामाला लागल्याचा आरोप होऊ लागलाय. वाल्मिक कराडवर पोलीस मेहेरबान असल्याचा आरोप होतोय. असं असतानाच बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांवरही अंजली दमानियांनी गंभीर आरोप केलेत. डॉक्टर अशोक थोरात हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय. अशोक थोरात यानं आपल्या शासकीय कार्यकाळात मोठी माया गोळा केल्याचाही आरोप त्यांनी केलाय.


डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली.पुन्हा बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून रूजू झाले. अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेलमुळे थोरात चर्चेत होते.पियुष इन हॉटेल थोरात कुटुंबियांच्या मालकीचं आहे. अशोक थोरात यांचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचा आरोप दमानियांनी केलाय.


एवढंच नाही तर अशोक थोरातांविरोधात शासकीय चौकशी सुरु असल्याचाही आरोप दमानियांनी केलाय. त्यांच्याविरोधात अनेक प्रकरणं प्रलंबित असल्याचा आरोपही अंजली दमानियांनी केलाय.


अशोक थोरातांच्या नेतृत्वात संतोष देशमुखांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. वाल्मिकच्या पोटदुखीचा उपचारही थोरातांच्या नेतृत्वात झाला. थोरातांच्या पूर्वइतिहास पाहता त्यांच्या कामाबाबत शंका असल्याचं दमानियांना वाटतं.


सुरेश धस मात्र जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात हे निष्कलंक असल्याचा दावा करतायेत.डॉक्टर अशोक थोरातांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळलेत. दमानियांचा दावा खरा मानला तर एवढा भ्रष्ट अधिकारी त्याचं काम चोख करेल का? याबाबत शंका व्यक्त केली जातेय.