अहमदाबाद: इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याची पिढी कॅशलेस व्यवहारांकडे वळताना दिसत आहे. इंटरनेट ही काळाची गरज बनत चालली आहे. गावातील या प्रश्नाला घेऊन सरपंचाने काम सुरु केले. 
संपूर्ण गावातील लोकांना या माध्यमातून मोफत इंटरनेट सुविधा दिली जात आहे. मोबाईलवरून कॅशलेस व्यवहार करण्यापासून सोशल मीडियापर्यंत सर्व बाबतीत यामुळे सुविधा मिळत असल्याने गावातील ‘हायटेक’ लोक खूश आहेत. 


पावी जेतपूर या गावाची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. आदिवासी बहुल अशा या गावातील हे पाऊल बदलत्या जमान्याचे प्रतीक मानले जात आहे. अनेक गावांसमोर या गावाने आदर्श निर्माण केला आहे.