Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं. संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल धस यांनी केला. मात्र यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. महायुतीत वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील, असा इशाराच मिटकरींनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संतोष देशमुख प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना आमदार सुरेश धस यांनी थेट अजित पवारांनाच आव्हान दिलं. संतोष देशमुख प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अजितदादा मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत, असा सवाल धस यांनी केला. मात्र यानंतर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी धस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय. महायुतीत वाद झाल्यास त्याला सुरेश धस जबाबदार असतील, असा इशाराच मिटकरींनी दिलाय.


 सूरज चव्हाण यांच्या टीकेनंतर सुरेश धस यांनी आपल्या खास शैलीत चव्हाण यांचा समाचार घेतलाय. संतोष देशमुख प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाचे आमदारच एकवटलेत. सुरेश धस यांच्यासह महायुतीच्या अनेक आमदारांनी या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी अजितदादांकडे विरोधक बोट दाखवत आहेत. त्यामुळे बीड प्रकरणावरून महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा सामना रंगलाय.