`अशा लोकांनी थेट...`, संतोष देशमुखांच्या भावाचं पोलिसांना खळबळजनक पत्र; वाल्मिक कराडचाही उल्लेख
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहेत.
Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशीसंबंधित खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली सीआयडीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. 31 डिसेंबर रोजी कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये शरण आल्यानंतर त्याची चौकशी सुरु झाली आहे. असं असतानाच ताब्यात असेलल्या कराडला विशेष वागणूक दिली जात असल्याच आरोप मयत सरपंचाचा धाकटा भाऊ धनंजय देशमुखने केली आहे. यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये त्याला अलेला अनुभव त्याने बीडच्या पोलीस अधिक्षकांना लिहून कळवला आहे.
वाल्मिक कराडसारख्या व्यक्तीला अगदी कोठडीपर्यंत लोक भेटायला येत असतील तर माझ्या भावाला न्याय कसा मिळणार असा सवाल धनंजय यांनी पत्रामधून उपस्थित केला आहे. बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना धनंजय देशमुखांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये विषय, 'शहर पोलीस ठाणे बीड येथे वाल्मिक कराड यांना मिळणाऱ्या सुविधा व यंत्रणेचा गैरवापर याबद्दल' असं नमूद केलं आहे. तसेच अर्जदार म्हणून धनंजय पंडितराव देशमुख (मस्साजोग) असं लिहिलेलं आहे. या पत्राचा मजकूर जसाच्या तसा खालीलप्रमाणे:
वरील विषयान्वये तक्रार करणार मी, नामे धनंजय पंडितराव देशमुख असून माझे सख्खे बंधून संतोष पंडितराव देशमुक यांची हत्या 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करुन आरण्यात आली. या हत्येसंदर्भात आज 24 दिवस उलटले असून या कामी पोलीस स्टेशन शहर बीड येथे गेलो असता, खंडणी प्रकरणी आरोपी असेलेल वास्मिक कराय यांना भेटण्यासाठी कोरेगाव माजी सरपंत पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले. मला विचारले तू इथे काय करायला? सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटले तुम्ही त्या सहा त्यारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात. आम्हाला म्हटला आरोपी मीच पकडले. आणि माझ्या भावाची हत्या करमाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला. व आरेरावी केली. तसेच संतापजनक माझ्याशी वागला.
नक्की वाचा >> वाल्मिक कराडची सोंगं! CDI कोठडीत असताना हवाय 24 तास हेल्पर अन् 'ही' मशीन
आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्याने हुज्जत घातली व आपण सीआयडीसोबत आलो आहोत असे सांगितले. येथील दंगल पथकातील कर्मचारी यांना आपण सीआयडीचा वाहनचालक असल्याचे म्हटला. रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालादी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढता त्या ठिकाणी असेलले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करुन बोला असे उलट रेडेकर यांनाच बोलले व तांदळे यांना पाजूच्या रुममध्ये बसवून नंतर सोडून दिले. साहेब माझी आपल्याकडे तक्रार आहे की ज्या ठिकाणी आरोपी आहेत अशा ठिकाणी असे लोक येतात कसे? खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता अशी माझी तक्रार आहे. अशा लोकांनी थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार?
तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा अशी शंका या ठिकाणी मला आलेली आहे. या संदर्भाने आपण बालाजी तांदळे यांची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी मी करत आहे. यावेळी एपीआय दराडे यांनी तांदळे यांना पाठीशी का घातले? दराडे आणि तांळे यांचे संगनमत असून यातून तपास प्रभावित होत असेल तर? माझ्या भावाची हत्या झालेली आहे यात कुमे हलगर्जी केली तर आरोपींना शासन होणार नाही. यासाठी बालाजी तांदळे व एपीआय दराडे यांची चौकशी अपेक्षित असून यांना वाल्मिक कराड यांच्यापासून दूर ठेवावे अशी मी मागणी करत आहे. वरील घटना घडली तेव्हा माझ्या समवेत माझे साडू दादासाहेब बाबुराव खिंडकर तथा माझे सुरक्षा रक्षक पोलीस करमचारी नितीन जाधव हे होते.
आता बीडचे पोलीस अधिक्षक या पत्राच्या आधारे काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.