सातारा : मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून वडिलांनी मुलीसह जावई आणि नातीवर पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. साताऱ्यातील कृष्णानंतर भागात ही घटना घडली. जावयाने प्रगंगावधान राखत सासऱ्यांना अडवल्याने मोठा अनर्थ टळला.


काय आहे प्रकरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

19 वर्षांपूर्वी या मुलीने आंतरजातीय विवाह केला. पण इतक्या वर्षांनंतरही वडिलांच्या मनातून राग गेला नव्हता. रविवारी मुलगी आणि तिचा पती आपल्या दोन मुलांना आणण्यासाठी माहेरी आले होते. यावेळी सासऱ्यांनी पुन्हा जुना वाद उकरुन काढला. ‘तू माझ्या मुलीसोबत आंतर जातीय विवाह केलास. त्यामुळे आमची इज्जत धुळीला मिळाली’ असं म्हणत सासऱ्यांनी जावयासोबत वाद घातला.


जावयावर पिस्तून रोखत “आज तुम्हाला संपवतोच, दाखवतो मी काय आहे ते” अशी धमकी दिली. पण जावयाने प्रसंगावधान राखत सासऱ्यांना अडवलं आणि मोठा अनर्थ टळला


ही सर्व घटना 18 वर्षांच्या नातीने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केल्यामुळे नातीला धक्काबुक्की करत धमकीही दिली. याप्रकरणी नातीने आपल्या आजोबांवर विनयभंगाची तक्रार सातारा शहर पोलिसांत दाखल केली आहे.