सातारा : अरूणाचल प्रदेशात देशसेवा बजावत असताना, साताऱ्यातील खंडाळा तालुक्यातील कराडवाडीचे जवान सुभाष लाला कराडे हे शहीद झाले. जेवण झाल्यावर सगळे जवान शुक्रवारी रात्री तंबूत बसले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थंडीपासून ऊब देणाऱ्या बुखारीचा त्याचवेळी स्फोट झाला. इतर जवान बसलेल्या तंबूला आग लागली, यात कराडे देखील होते, कराडे यात गंभीर जखमी झाले. कराडेंना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर उपचार सुरू असताना कराडेंची प्राणज्योत मालवली.


शहीद जवान सुभाष कराडे सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती खंडाळ्याचे तहसीलदार विवेक जाधव यांनी ही माहिती दिली.


कराडवाडी येथील जवान सुभाष कराडे भारतीय सैन्य दलात हे २००१ मध्ये सहभागी झाले होते. कराडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कराडवाडी आणि अंदोरी या ठिकाणी झाले. तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल अंदोरी येथे झाले. 


२०१६ मध्ये त्यांची भारतीय सैन्य दलातील सेवा संपली होती. मात्र त्यांनी आणखी दोन वर्षे देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयीन शिक्षण लोणंदमध्ये झाले. जवान सुभाष कराडे मागील १६ वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते.