मुंबई : कराड-विटा मार्गावरील बंद करण्यात आलेला धोकादायक पूल अखेर आज पहाटे कोसळला. हा पूल वाहतुकीसाठी २९ जुलै रोजी बंद करण्यात आला होता. आज पहाटे हा पूल कोसळला.  कोयना नदीवरील तांबवे पूल वाहतुकीसाठी धोकादायक होता. सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही ही गोष्ट समोर आली होती. त्यानंतर काही महिने या पुलावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, नवीन पुलाचे काम रखडल्याने नाराजी व्यक्त होत होती. वाहनचालकांना आणि ग्रामस्थाना याचा त्रास सहन करावा लागत होते. सात ते आठ किमीचे जादा अंतर दररोज कापावे लागत होते. जुना पूल धोकादायक होता. असे असतानाही बांधकाम विभागाने पुलावर सुरूवातीला मध्यभागी रस्त्यावर लावलेले लोखंडी अँगल काढून  टाकण्यात आले होते. जीव  धोक्यात घालून तांबवेसह परिसरातील १२ गावातील लोक या पुलावरून २९ जुलै २०१९ पर्यंत प्रवास करत होते.


दरम्यान, या धोकादायक पुलाचे छायाचित्र आणि खचलेल्या पुलाच्या दगडी पिलरही सोशल मीडियावर व्हायरल होत होते.