मुंबई : महाविकासआघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसने नाराज आहे. काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. पण या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आघाडीचे गठन होत असतांना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही ? हा माझ्या सारख्या सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. असं काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.



सत्यजित तांबे यांनी ट्विटसोबत तांबे फोटो जोडलेला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांचा फोटो आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना राज्य सरकारमध्ये डावलण्यात येत असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.


याआधी सत्यजित तांबे यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय समित्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांना उचित स्थान दिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शासकीय समित्यांमध्ये युवक काँग्रेसला प्रतिनिधीत्व द्यावे, अशी मागणी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती. तांबे यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे व इतर मंत्र्यांनाही हे पाठविले आहे.