महाराष्ट्रातील 80 कॉलेज देशाच्या टॉप रँकिंगमध्ये! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ
Top University In India : राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 80 शैक्षणिक संस्थाचा समावेश आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सर्व राज्यांमध्ये तीसरी सर्वोत्कृष्ट विद्यापीठ म्हणून स्थान मिळाले आहे.
Savitribai Phule Pune University : राजधानीतील भारत मंडपम येथील सभागृहात, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने उच्च शैक्षणिक संस्थांची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग-2024 आज जाहीर करण्यात आली. शिक्षण, शिक्षण आणि संसाधने, शोध आणि व्यावसायिक कार्यप्रणाली, पदवी परिणाम, संपर्क आणि समावेशिता, कल्पना या मापदंडांवर एकूण 13 श्रेणींमध्ये सर्वोत्कृष्ट 80 संस्थांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला असून, यात राज्यांतील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे, सर्वोत्कृष्ट मुक्त विद्यापीठे आणि कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला. यामध्ये पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेला तीसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट विद्यापीठाचे मान प्राप्त झाला.
सर्वोत्कृष्ट समग्र संस्थांमध्ये महाराष्ट्राच्या 11 संस्था
संस्थात्मक रँकिंगच्या यादीत समग्र संस्थांच्या श्रेणीमध्ये निवडलेल्या देशातील 100 शैक्षणिक संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 11 शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या क्रमवारीत तीस-या स्थानावर आहे तर होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (27), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे (37), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे, (42), सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे, (52), रसायनशास्त्र तंत्रज्ञान संस्था, मुंबई (56), डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ, पुणे(63), दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एडुकेशियन अँड रीसर्च, वर्धा (71), विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (77), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई(84) तसेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (98) क्रमांकावर आहे.
विद्यापीठ रँकिंग मध्ये राज्यातील 10 विद्यापीठे
यादीत देशातल्या 100 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये महाराष्ट्रातील 10 विद्यापीठांचा समावेश आहे. यात क्रमांक निहाय संस्थांचा समावेश - होमी भाभा राष्ट्रीय संस्था, मुंबई (16), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे (23) सिम्बायोसिस इंटरनॅशनल पुणे (31), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई (35), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था, वर्धा (42), एस. व्ही. के. एम. ची नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई (49), टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई (58), मुंबई विद्यापीठ मुंबई (61) तर भारती विद्यापीठ पुणे (78) क्रमांकावर आहे.
राज्य सार्वजनिक विद्यापीठे (State Public University)
या वर्षापासून सर्व राज्यातील सार्वजनिक विद्याापीठांचा अवलोकन करण्यात आले असून यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. या सोबतच, मुंबई विद्यापीठ, मुंबई (18), सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे (33) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (46) क्रमांकावर राहिले आहेत.
संशोधन संस्थांच्या रॅकिंग मध्ये राज्यातील 5 संस्था
संशोधन संस्थांच्या रँकिंग मध्ये देशातील 50 संस्थामध्ये महाराष्ट्रातील 5 संस्थांचा समावेश आहे. यामध्ये चौथ्या क्रमांकावर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (4) आहे तर, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट बॉम्बे (6), टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (12), भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (29) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई (40) व्या स्थानावर आहे.
राज्यातील पाच अभियांत्रिकी संस्थांची रँकिंग
अभियांत्रिकी शिक्षण संस्थेच्या रँकिंग मध्ये देशातील 100 अभियांत्रिकी संस्थांमध्ये महाराष्ट्रातील पाच संस्थांचा समावेश आहे. यात भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई तिस-या क्रमांकावर, विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, नागपुर (39), इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी बॉम्बे (41), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे (63) तर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे (77) व्या स्थानावर राहिले आहे.
चार महाविद्यालयांना मिळाली रँकिंग
महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 100 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील चार महाविद्यालयांचा समावेश आहे. यात फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) पुणे (45) क्रमांकावर, सरकारी विज्ञान संस्था, नागपूर (64) व्या क्रमांकावर, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई (89) तर श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती (99) वा स्थान प्राप्त केला आहे.
राज्यातील नऊ व्यवस्थापन संस्थांना रँकिंग
देशातील 100 उत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये महाराष्ट्रातील नऊ संस्थांचा समावेश आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई (6), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (10), सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट पुणे (13), एस. व्ही. के. एम. नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई (20), एस.पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, मुंबई (20), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट नागपूर (31), के.जे. सोमैया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसेराच मुंबई (63), प्रिन्स.एल.एन वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्था, मुंबई (84) तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे (91) वा क्रमांक मिळवला आहे.
औषधीय संस्थांमध्ये राज्यातील 16 संस्था
देशातल्या उत्कृष्ट 100 औषधीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 16 संस्थांचा समावेश आहे. पहिल्या 10 औषधीय संस्थांमध्ये मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पाचव्या क्रमांकावर नाव कोरले. एस.व्ही.के.एम नरसी मोन्जी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज- मुंबई या संस्थेने 10 व्या स्थानावर आपले नाव कोरले. यासोबतच, पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे (35), डॉ. डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च, पुणे (36), एसव्हीकेएमचे डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई (39), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (51), आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल शिक्षण आणि रिसर्च शिरपूर, (56), श्रीमती. किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी नागपूर, (61), कृष्णा विश्व विद्यापीठ कराड, (67), डॉ.विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे (72), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (73), वाय.बी.चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, औरंगाबाद (76), भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर (80), पी.ई. सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी पुणे, (96), प्राचार्य के.एम. कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई (97) तर एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसी पुणे (99) वा क्रमांक मिळवला.
वैद्यकिय महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये तीन महाविद्यालय
वैद्यकीय महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे (11), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (23) तसेच सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (30) वा स्थान प्राप्त केला आहे. कल्पकता (इनोव्हेशन) संस्था या श्रेणीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे या संस्थेने अव्वल क्रमांक मिळवला आहे.
दंत महाविद्यालयांच्या रॅकिंगमध्ये सहा महाविद्यालय
दंत महाविद्यालयांच्या रँकिंग मध्ये देशातील 40 महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्रातील सहा महाविद्यालयांचा समावेश आहे. यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे पाचव्या क्रमांकावर तर, शासकीय दंत महाविद्यालय नागपूर (15), दत्ता मेघे उच्च शिक्षण आणि संशोधन संस्था वर्धा (24), शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई (25), नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज, मुंबई (28) ता भारती विद्यापीठ (मानित) दंत महाविद्यालय आणि रुग्णालय पुणे (36) स्थानावर आहे. कृषी आणि संलग्न क्षेत्रात केंद्रीय मत्स्यपालन शिक्षण संस्था, मत्स्यपालन विद्यापीठ, मुंबई या संस्थेने नव्वा स्थान प्राप्त केला आहे. वास्तुकला आणि नियोजन या श्रेणीमध्ये विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर या संस्थेने दहावा स्थान मिळवला आहे.
राज्यातील तीन विधी महाविद्यालयांची रॅकिंग
देशातील 30 सर्वोत्कृष्ट विधी महाविद्यालयांमध्ये सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे या संस्थेला पाचवा क्रमांक मिळाले असून, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, मुंबई (31) तर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूर या संस्थेला 34 व्या क्रमांकावर आहे.
कौशल्य विद्यापीठ या श्रेणीमध्ये सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ अव्वल शैक्षणिक वर्ष 2024 पासून तीन नवीन श्रेणींचा समावेश करण्यात आला. यात कौशल्य विद्यापीठांचा समावेश करण्यात आला आहे. यात सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठ (पूर्वी सिम्बायोसिस कौशल्य आणि मुक्त विद्यापीठ पुणे) देशातील पहिली उत्कृष्ट विद्यापीठ ठरली आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांती मुजुमदार, युजीसी अध्यक्ष प्रा. एम जगदीश कुमार, ऑल इंडिया कॉउसिंल ऑफ ट्रेनिंग अँड एजुकेशन अध्यक्ष प्रा. टी.जी. सिथाराम, शिक्षण मंत्रालयाचे सचिव के. संजय मूर्थी, सह सचिव गोविंद जयस्वाल यासह सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.