धुळे : एटीएम कार्ड स्कॅन करून त्याद्वारे पैसे काढणाऱ्या उत्तर प्रदेशच्या टोळीला नंदूरबार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नंदूरबारसह राज्यभरात या टोळीने हे कारणामे केले असल्याचे निष्पन्न झाले असून, अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 


पैसे काढताना सावधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैय्यदखान कमालउद्दीन खान, तौफीकखान सनाफ मुस्तकीनखान, ओमप्रकाश मनिराम जयस्वारल सर्व राहणार उत्तर प्रदेश यांचा संशयीत आरोपींमध्ये समावेश आहे.या टोळीने जिल्ह्यात तसेच जळगाव, भुसावळ, धुळे, शिरपूर, मुंबई या परिसरात या टोळीने कारनामे केले आहेत. या टोळीतील सदस्य एटीएम मध्ये पैसे काढणाऱ्या लोकांच्या मागे उभे राहून पासवर्ड जाणून घेत असत. 


बनावट कार्ड तयार


त्यानंतर घाईगर्दीत पैसे काढायचे असल्याचे सांगून एटीएमचा डाटा त्यांच्याकडील दुसऱ्या एटीएम कार्डमध्ये स्कॅन करून बनावट कार्ड तयार करीत असे. त्याद्वारे आणि पासवर्डद्वारे ठिकठिकाणाहून पैसे काढून किंवा दुसऱ्या खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूक करीत होते.