`आमच्या पप्पांनी गणपती आणला…` रातोरात रीलस्टार झालेला चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का?
Little Boy Video Viral : इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर रातोरात रीलस्टार झालेल्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहिला का? आमच्या पप्पांनी गणपती आणला...हे गाण गाणाऱ्या क्यूट चिमुकला सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
Little Boy Video Viral : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. अख्खा देश या क्षणाची आतुरतेने (Ganeshotsav 2023 Video) वाट पाहत आहे तो काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणरायाचं मोठ्या थाट्यामाट्यात आगमन होणार आहे. सोशल मीडियावरही गणरायाचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतं आहे. नेटकरीही बाप्पामय झालेले आहेत. अशातच इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुकवर एक चिमुकल्या सर्वांना वेड लावतं आहे. रातोरात हा चिमुकला रीलस्टार झाला आहे. (school little boy Amchya Pappani Ganpati Anala video viral Instagram Facebook trending now)
'आमच्या पप्पांनी गणपती आणला…' (Amchya Pappani Ganpati Anala) हे गाणं एक शाळकरी चिमुकला गाताना दिसतं आहे. हा व्हिडीओ सोशल (Ganpati Viral Video) मीडियावर धुमाकूळ घालतोय. हा क्यूट मुलाने इंटरनेवर जादू केली आहे. ही इन्स्टा रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून आतापर्यंत 20 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. प्रत्येक जण हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करत आहे आणि एकमेकांना शेअरही करत आहेत.
बाप्पाचं गाणं म्हणणाऱ्या हा चिमुकल्याचे हावभाव प्रत्येकाला आपलसं करत आहे. पण हा चिमुकला आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...साईराज केंद्र या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा चिमुकला 4 वर्षांचा असून तो बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी गावातील आहे.
या मुलांचं नाव साईराज असून तो माऊली अनुराधादेवी इंग्लिश हायस्कूलमध्ये शिकतो. शाळेच्या पोषाशात त्यांने हे गाणं गायलं आहे. सर्वत्र बघावं तिकडे याच मुलांचं कौतुक सुरु आहे.
हा चिमुकला जे गाणं गातोय ते काही नवीन नाही. माऊली प्रॉडक्शन हे गाणं गेल्या वर्षींच रिलीज झालं होतं. या गाण्याला आतापर्यंत तब्बल तीन मिलियन्स व्ह्यूज आले आहे. हे गाणं सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्रम, फेसबुक, युट्युबवर बघावं तिकडे हेच गाणं आहे. सोशल मीडियावर एखाद्या गाण्याचा ट्रेंड आला की त्यावर अनेक रील्स बनतात.
सध्या या मुलाचं गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणं सोशल मीडियासोबतच अनेक गणेश मंडळात वाजेल त्यात काही शंका नाही.