पुणे : मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यातील (Pune) शाळा (School) १३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol) यांनी याबाबत माहिती दिली आहे. खासगी शाळांनाही हा निर्णय लागू असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. २३ नोव्हेंबर पासून नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र सद्धस्थितीचा आढावे घेत पालकांशी चर्चा करण्यात आली.  त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान १३ डिसेंबरला परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.



कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह राज्यातील कोरोनाचं सावट अजूनही कमी झालेले नाही. 


मुंबईतही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई महापालिकेने आपल्या हद्दीतील शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ठाण्यातल्याही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. आता पुण्यातील शाळा १३ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यात वाढ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.