सांगली : एकीकड़े डॉ. खिद्रापुरेने केलेल्या स्त्री भ्रूण हत्येच्या, घटनेने मिरज तालुक्याचं नाव बदनाम झालं होतं. मात्र याच तालुक्यातील एका तरुणाने आदर्शवत काम केलं आहे. मिरज शहरातील अतुल दबड़े या युवकाने आपल्याला दुसऱ्यांदा ही मुलगी झाली म्हणून, एक मोठा आनंद सोहळा साजरा केला आहे. अतुल दबड़े यांनी आपल्या मुलीच्या जन्माचे अनोख्या पद्धतीने  स्वागत केले आहे. 


महिलांना फेटे बांधून पारंपरीक वेशभूषा


ढोल ताशे, हलगी, तुतारी वाजवुन त्याच बरोबर महिलांना फेटे बांधून पारंपरीक वेशभूषा करुन हा सोहळा पार पाडला आहे. त्याच बरोबर साखर पेढ़े ही वाटले आहेत. आपली मुलगी आभा हिच्या जन्माचे स्वागत दबडे दाम्पत्यांने मोठ्या अभिनव पद्धतीने केले असून एक नवा आदर्श निर्माण केला आहे.