Hidden Places In Mumbai : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी, रस्त्यांवर वाहनांचा गोंगाट आणि घडाळ्याच्या काट्याबरोबर फिरणारे लोक असे काहीसे मुंबईचे चित्र आहे. याच मुंबईच्या गर्दीत अनेक पर्यटन स्थळ देखील आहेत. या पर्यटनस्थळांमध्ये समुद्र किनारे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतता. मुंबईचे समुद्र किनारे देखील  गर्दीने गजबजलेले असतात. या समुद्र किनाऱ्यावर फिरताना आनंद वाटतो. पण, एकांत आणि मनाला शांती मिळत नाही. अशा वेळेस मुंबईच्या अगदी जवळ असलेले हा समुद्र किनारा फिरण्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो.   Valentine Day सेलिब्रेट करण्यासाठी ही जागा परफेक्ट आहे. 


नालासापोरा स्टेशनपासून अगदी जवळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या अगदी जवळ असलेले हा समुद्र  नालासापोरा स्टेशनपासून अगदी जवळच्या अंतरावर आहे. कळंब बीच असे या समुद्र किनाऱ्याचे नाव आहे. हे  ठिकाण फारसे कुणाला माहित नाही. यामुळे येथे येणाऱ्या पर्टकांची संख्या खूपच कमी आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ असा  हा समुद्र किनारा आहे. नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा समुद्र किनारा आहे. अगदी गावात पोहचलो तरी पुढे इतका सुंदर आणि अथांग समुद्र किनारा पहायला मिळेल याची पर्यटकांना कल्पना येत नाही. कळंब गावातून आता गेल्यावर गावाची हद्द संपली की हा समुद्र किनारा सुरु होतो. समुद्र किनाऱ्यावर कांदळवन आणि छोटसं सुरुचं बन देखील आहे. या समुद्र किनाऱ्यावरची वाळू ही चंदेरी रंगाची आहे. या समुद्राचे पाणी देखील स्वच्छ आहे. समुद्र किनाऱ्यावर फेटफटका मारताना एका बाजूला वसईचे दृष्य दिसते. तर, दुसऱ्या बाजूला डहाणू, पालघरचे समुद्र किनारे दिसतात. येथे अप्रतिम असा सनसेट पहायला मिळतो. येथे पर्यटकांची फारशी गर्दी नसल्यामुळे या समुद्र किनाऱ्याजवळ हॉटेल्स किंवा खाद्यापदार्थांची दुकाने नाहीत.


या सिक्रेट समुद्र किनाऱ्यापर्यंत जायचे कसे?


नालासोपारा पश्चिम येथील कळंब गावात हा कळंब हा समुद्र किनारा आहे. कळंब गावाच्या नावावरुनच या समुद्र किनाऱ्याला कळंब बीच हे नाव पडले आहे. येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील नालासोपारा रेल्वे स्थानाकात उतरावे लागते. रेल्वे स्थानाकातून बाहेर पडल्यावर पश्चिमेला कळंब हे गाव आहे.  नालासोपारा रेल्वे स्टेशनबाहेरुन कळंब गावात जाण्यासाठी वसई विरार परिहवन सेवेची बस पकडू शकता. याशिवाय रिक्षाने देखील जाता येते. रिक्षाने गेल्यास रिक्षा थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहचवते.