Nashik Swine Flu News: उन्हाळ्यामुळं आधीच नागरिक हैराण झाले आहेत. उष्माघातामुळं नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. त्यातच आता नाशिककरांची झोप उडवणारी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये स्वाइन फ्लुचा शिरकाव झाला आहे. स्वाइन फ्लुची लागण झाल्यानंतर सिन्नरच्या एका महिला मृत्यू झाला आहे. तर, आणखी तीन रुग्ण समोर आले आहेत. स्वाइन फ्लुचे रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्य विभागाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. (Maharashtra Swine Flu Guideline)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात वाढ होत असताना स्वाइन फ्लुच्या संसर्गातही वाढ होते. नाशिकमध्ये स्वाइन फ्लुमुळं एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत. सिन्नरमध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांचा नाशिक शहरात उपचार सुरू आहेत. सध्या या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र तरीही आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि शीतपेय पिताने सावधानी बाळगा, असे अवाहन करण्यात येत आहे. 


स्वाइन फ्लुच्या संसर्गानंतर मनपा अलर्ट मोडवर आली आहे. मनपाने अवाहनाचे पत्रक काढत नागरिकांना विशेष सूचना दिल्या आहेत. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा आणि लहान मुलांमध्ये जुलाब उलटी अशी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन, मनपाने केले आहे. तसंच, काळजी घेण्यासही मनपाने सांगितले आहे. 


आरोग्य विभागाने काय म्हटलं?


हा रोग विषाणूपासून होणारा असून हवेमार्फत पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यांतून किंवा खोकल्यातून उडणाऱ्या थेंबावाटे एका रुग्णापासून निरोगी रुग्णाकडे पसरतो, असं मनपाने म्हटलं आहे. 


लक्षणे काय?


ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी,खोकला, थकवा, लहान मुलांमध्ये जुलाब उलटी यासारखी लक्षणे आढळतात. 


हे करा 


>> वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
>> पौष्टिक आहार घ्या
>> लिंबू आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या आहारात वापरा.
>> धूम्रपान टाळा
>> पुरेशी झोप व विश्रांती घ्या
>> भरपूर पाणी प्या
>> खोकताना व शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवा. 


हे करु नका


>> कोणत्याही व्यक्तीसोबत हात मिळवू नका
>> सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
>> डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
>> गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका
>> संशयित रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका
>> लक्षणे आढळल्यास मुलांना शाळेत पाठवू नका.