नांदेड : महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले अनेक नेते ईडी (ED) आणि आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. पण आता ईडीची पुढची कारवाई काँग्रेस (Congress) नेत्यावर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी तसे संकेत दिले आहेत. नांदेडमधल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीची पुढची कारवाई नांदेडला होणार असल्याचे संकेत काल चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. माझ्या हसण्यावरुन समजून घ्या असं ते काल म्हणाले होते . पाटील यांचा रोख अप्रत्यक्ष रोख काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर होता. आज पुन्हा त्यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत, करा बातमी मोठी असं पाटील म्हणाले आहेत. 


चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर सोमय्या नांदेडला येऊन कोणत्या नेत्याविरोधात पत्रकार परिषद घेणार याकडे लक्ष लागल आहे. स्वत: किरीट सोमय्या यांनीही दिवाळीनंतर एका बड्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं म्हटलं आहे.


दरम्यान देगलूरच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना घेरण्याची भाजपची रणनिती असल्याचं बोललं जात आहे.