उस्मानाबाद : उस्मानाबादमधले ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांना औरंगाबादच्या अप्रतिम मीडियाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप असून मुंबईत एका विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबादच्या अप्रतिम मीडियाच्या वतीने दरवषी उल्लेखनीय पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार येण्यात येतो. सन २०२२ च्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांना ग्रामीण विकास वृत्त बीटसाठी निवड करण्यात आली असून या पुरस्काराची घोषणा डॉ. अनिल फळे यांनी नुकतीच केली आहे.


पत्रकार सुनील ढेपे यांना यापूर्वी लोकमतचा  पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९० ), अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९२ ) कै. नागोजी दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ( २०१६ ), पत्रकार कल्याण निधीचा कै . बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार ( २००६ ) , पुणे प्रेस क्लबचा युवा पत्रकारिता पुरस्कार ( दोन वेळा ) असे  ३० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.