नाशिक पोलीस आयुक्तांच्या लेटरबॉम्बने खळबळ
Nashik Police Commissioner Deepak Pandey`s letter bomb : राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनले आहेत, असा आरोप पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे.
योगेश खरे / नाशिक : Nashik Police Commissioner Deepak Pandey's letter bomb : राज्यात महसूल अधिकारी आरडीएक्स तर दंडाधिकारी हे डिटोनेटर झाले आहे. या दोघांची भ्रष्ट युती म्हणजे जिवंत बॉम्ब बनले आहेत. मोक्याच्या जमिनीबाबत महसूल विभागाकडे नागरिकांनी दावा केल्यानंतर महसूल अधिकारी त्यांना असलेल्या दंडाधिकाऱ्यांच्या फौजदारी, महसूली अधिकारानुसार सामान्य नागरिकांना भूमाफिया अडकवितात, असा दावा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे.
पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या दाव्यात म्हटले आहे की, अडकलेल्या जमीन मालकांकडून कमी भावात भुमाफिया त्यांच्या जमिनी लाटतात. त्यामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे, असा दावा पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी केला आहे. या दाव्यामुळे महसूल यंत्रणेतील त्रुटीवर घाव घातला आहे.
महसूली दंडाधिकाऱ्यांचे जमीनविषयक अधिकार महसूली जिल्हे ही संकल्पना बंद करुन त्याऐवजी भुमाफियागिरी वाढल्याने नाशिकसह 7 जिल्ह्यात आयुक्तालये संकल्पना राबविली जावी, अशी मागणी करीत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी आणखी एक लेटर बॉब टाकला. पोलीस महासंचालकांसह राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना पाठविलेल्या या पत्राने महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.