नागपूर: लग्न समारंभात कोल्ड्रिंक टाळून दूध द्या आणि शेतकऱ्यांना जगवा असा कानमंत्र केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. ते नागपुरात मदर डेअरीने आयोजित केलेल्या गिफ्ट मिल्क या कार्यक्रमात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न वा समारंभामध्ये कोल्ड्रिंकऐवजी पाहुण्यांना दुधाचा पाहुणचार दिला तर त्यांचे आरोग्य सुधारेल. शिवाय दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन तेही जगतील असे, नितीन गडकरी यांनी सांगितले. 


काही दिवसांपूर्वीच दूध उत्पादकांच्या आंदोलनानंतर सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची मागणी मान्य केली होती. त्यामुळे दुधाला  २५ प्रतिलिटर भाव मिळाला होता. दूध महासंघाला २५ रुपयांपेक्षा कमी भाव देता येणार नाही असे सरकारने निक्षून सांगितलं आहे. २१ जुलैपासून हा निर्णय लागू झाला.