उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. साई सिद्धी बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावरून स्लॅब थेट तळ मजल्यावर कोसळला. या इमारतीमधील आणखी 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम निघाली आहे. अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दुर्घटनेत कृष्णा बजाज 24, दिनेश चांदवानी, मोहिनी चांदवानी, दीपक चांदवानी, पुनीत चांदवानी, नम्रता बजाज यांचा मृत्यू झाला आहे.


आतापर्यंत दोन लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या इमारतीत एकूण 29 फ्लॅट आहेत. अग्निशमन विभागाकडून बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.



उल्हासनगर नेहरू चौक परिसरातील साई शक्ती ही पाच मजली इमारत आहे आज रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या इमारतीवरील चौथा मजल्याचा स्लॅब पत्त्या सारखा कोसळून थेट तळमजल्यावर आला. 


उल्हासनगरमध्ये काही दिवसांपूर्वी असा अपघात झाला होता


यापूर्वी 15 मे रोजी उल्हासनगरमध्ये एका इमारतीचा काही भाग कोसळला होता. ज्यामुळे 4 जण ठार झाले होते. या अपघातात 11 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या इमारतीत 9 फ्लॅट आणि 8 दुकाने होती. या दुःखद घटनेनंतर मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या अपघातानंतर आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.


आठवडाभरापूर्वीच उल्हासनगर मधील मोहिनी पॅलेस इमारतीमध्ये देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता.सतत घडणाऱ्या या घटनांमुळे उल्हासनगरमधील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय .