नागपूर : गेल्या ४८ तासात देशानं सात वाघ गमावलेत. विदर्भात झालेल्या विविध घटनांमध्ये सात वाघांनी आपले प्राण गमावलेत. त्यापैकी काही वाघांच्या मृत्यूंना वनविभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचं पुढे आलंय. 


जखमी वाघाचा उपचाराविना मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एका जखमी वाघाचा उपचाराविना मृत्यू झाला. सोमवारी  नागभीड तालुक्यातील गंगासागर हेटी भागातील जंगलात हा बछडा वाघीणीपासून दूर झाल्याने एकटाच आढळला होता. अशक्त झालेल्या बछड्याला चंद्रपूर शहरालगत असलेल्या वनविभागाच्या प्राथमिक  शुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात आले होते. 


उपचारादरम्यान बछड्याचा मृत्यू


तज्ज्ञ वैद्यकीय अधिका-यांच्या देखरेखीत त्याचावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान या बछड्याचा मृत्यू झाला.  पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कोलितमाराजवळ पेंच नदीत २४ फेब्रुवारीला एक वाघ मृतावस्थेत आढळला.  गोरेवाड्यात वन्यप्राणी बचाव केंद्रात एका वाघिणीने तिचीचार पिल्ले  गमावली आहेत.