पिंपरी-चिंचवड येथे मोठे सेक्स रॅकेट उघड, 16 नायजेरियन तरुणी ताब्यात
पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट (Sex racket) पोलिसांनी (Police) उघड केले आहे.
पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट (Sex racket) पोलिसांनी (Police) उघड केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल 16 नायजेरियन तरुणींना (Nigerian young woman) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत या तरुणी व्यवसाय करत होत्या. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गेल्यावर्षी जानेवारीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये रॅकेट सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पिंपरी - पिंपरी - चिंचवड परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली गतवर्षी सेक्स रॅकेट चालविण्यात येत होते. आता पुन्हा सेक्स रॅकेट उघड झाल्याने कोणाच्या आर्शीवादाने हे रॅकेट सुरु होते, याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, मुंबई जवळच्या कल्याण येथेही काही महिन्यांपूर्वी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. चार बांग्लादेशी महिलांसह दलाला पोलिसांनी घेतल ताब्यात घेतले होते. हे सेक्स रॅकेट घरातच चालत होते. कल्याण पूर्वेतील नांदीवली परीसरातील एका इमारतीमधील घरावर छापा टाकून ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले. या चारही महिला बांग्लादेशी असल्याचे पोलिसांची माहिती दिली.
तसेच काही महिन्यांपूर्वी विरारमध्ये सेक्स रॅकेट उघड करण्यात आले. यावेळी तीन पीडितांची सुटका करण्यात आली. तर वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या बंटी बबलीला अटक करण्यात आली होती. विरार पश्चिम ग्लोबल सिटी येथील हायप्रोफाईल वस्तीत एका घरात चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली.