आमच्याकडे पैसेच उरलेले नाहीत; लॉकडाऊनमुळे नाशिकमधील वेश्यांची होरपळ
लॉकडाऊनमुळे या महिलांचा दैनंदिन रोजगार बंद झाला आहे.
नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक आर्थिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना याचा मोठा फटका बसला आहे. मात्र, केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर केल्याने या वर्गाला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, यानंतरही समाजातील अनेक घटक दुर्लक्षित राहिल्याच्या घटना समोर येत आहेत.
नाशिकच्या भद्रकाली परिसरातील वेश्या वस्तीतही सध्या असाच अनुभव येत आहे. लॉकडाऊनमुळे या महिलांचा दैनंदिन रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे या महिलांकडे आता रोजच्या खर्चालाही पैसे शिल्लक नाहीत. जर केंद्र सरकार देशातील सर्व घटकांना मदत करत असेल, तर मग आम्हाला मदत का मिळत नाही? सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.
मोदीजी, अमेरिकेसाठी एवढं करा, डोनाल्ड ट्रम्प यांची विनंती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या १५ तारखेपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशभरातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या मजुरांना एका रात्रीत परागंदा व्हावे लागले होते. अनेक मजूर शेकडो मैलांची पायपीट करून आपापल्या गावी परतले होते. यामुळे त्यांच्या उपजीविकेचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. परिणामी आता पुढे काय करायचे, असा प्रश्न या सर्वांना पडला आहे.
कोरोना व्हायरस : पबजी २४ तास बंद राहणार
दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल दिवसभरात करोनाचे १४५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ६३५वर गेली आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवायचा की नाही, याचा निर्णय पुढील परिस्थिती पाहूनच घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.