कोल्हापूर : कोल्हापूर पब्लिक स्कुलमध्ये चार अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं समोर आलंय. विजय मनुगडे या क्रीडा शिक्षकानंच हा प्रकार  केलाय. 13 ते 14  वयोगटातील या मुली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉकी प्रशिक्षणादरम्यान मॉलिश करणं आणि शॉर्ट्स खरेदी करण्याचा बहाण्यानं हा नराधम शिक्षक मुलींशी लगट करत असे. एका विद्यार्थिनीशी त्यानं 2-3 वेळा गैरकृत्य केल्याचंही समोर येतंय. 


मे महिन्यापासून हा प्रकार सुरू होता. मात्र दबावामुळे विद्यार्थिनींनी याबाबत वाच्यता केली नव्हती. अखेर हा त्रास वाढल्यामुळे चारही मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मनुगडेवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला असून तो फरार आहे.