झोपडपट्टीत राहणारी शहनवाज हिच्या जिद्दीला सलाम, पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश
Shahnawaz Pathan first Muslim first class judge in Pune : जिद्द, चिकाटी जोरावर झोपडपट्टीत राहणारी शहनवाज पठाण ही पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश झाली आहे.
सागर आव्हाड / पुणे : Shahnawaz Pathan first Muslim first class judge in Pune : जिद्द, चिकाटी,आणि परिश्रम केल्याने कोणतीही अशक्य गोष्टी शक्य होते, हे नेहमी आपण वाचत आलोय. याची प्रचिती आता पुण्यात पाहायला मिळाली आहे. अश्याच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समाजातील लोकांचा विरोध असताना देखील झोपडपट्टीत राहणारी शहनवाज पठाण ही पुण्यातील पहिली मुस्लिम प्रथमवर्ग न्यायाधीश झाली आहे.
सर्वत्र होत आहे कौतुक
पुण्यातील लोहियानागर येथे राहणारी शहनवाज पठाण हिने 24 एप्रिल रोजी दुसऱ्या प्रयत्नात प्रथमवर्ग न्यायाधीश या परीक्षेत यश संपादन केलं आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून ती याची तयारी करत होती आणि आज ती पुण्यातील पहिली मुस्लिम महिला न्यायाधीश झाली आहे. तिच्या या यशाचा सर्वत्र कौतुक होत आहे.
4 मुलींना चांगले शिक्षण
पुण्यातील अमन खा पठाण यांचं लोहीयानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून छोटे दुकान आहे. त्यांना 4 मुली आणि एक मुलगा आहे. पठाण हे सर्वसामान्य कुटुंबातील असून त्यांना त्यांच्या आयुष्यात जो शिक्षणासाठी त्रास झाला, तो त्रास आपल्या मुलांना होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या चारही मुलींना चांगल्या दर्जाचा शिक्षण दिले. मुलगी शिकली की सर्व घर शिक्षित होते, याच विचाराने त्यांनी त्यांच्या मुलींना शिक्षण दिले.
त्याची सर्वात मुलगी शहनवाज हिला त्यांनी तिच्या आवडीनुसार शिक्षण देऊन आज न्यायाधीश केलं आहे. काहींना मुलींच्या शिक्षणाला विरोध केला तरीही मुलींना शिक्षण त्यांनी शिक्षण दिले. आजही अल्पसंख्याक समाजात मुलींनी जास्त शिक्षण घेऊ नये असं सांगितलं जात असताना अमन पठाण यांची ईच्छा होती की त्यांच्या मुलींनी शिकावं यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि आहे. त्याच झोपडपट्टीत राहून मुलींना शिक्षण दिलं.
पाहिले मुलीचं शिक्षण मग घर अस विचार करुन त्यांनी मुलींना शिक्षण दिले. यात त्यांना त्यांच्या भावाने त्यांना मदत देखील केली. समाजातील काही लोकांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केला असताना देखील पठाण यांनी मुलींना शिक्षण देऊन शहनवाज हिला न्यायाधीश केलं आहे.
माझ्या या यशामागे माझे वडील
मला नेहेमी माझ्या शिक्षणासाठी घरच्यांचा पाठिंबा हा पहिल्यापासूनच होता. कधीही वडिलांची आर्थिक परिस्थिती ही माझ्या आणि माझ्या बहिणीच्या शिक्षणात आड आली नाही. लोक वडिलांना सांगत होते की, कशाला मुलींना शिकवत आहे. पण तरीही वडिलांनी आम्हाला शिक्षणात कोणतीही गोष्ट आडवी आणली नाही. नेहमी खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले आणि आज माझ्या या यशामागे माझे वडील असल्याचं शहनवाज हिने सांगितलं आहे.