नागपूर : जमावाच्या हल्ल्यात जखमी झालेला गुंड शक्तीमान याचा अखेर मृत्यू झाला आहे. सोमवारी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जुगार अड्डा बंद करण्याच्या वादातून शक्तीमानने  स्वयंम नगराळेया तरुणाचा हत्या केली होती. त्यानंतर फरार झालेल्या गुंड शक्तिमानला स्वयंमच्या मित्रांनी भांडे प्लॉट येथील मामाच्या घरातून  कौशल्यानगरात आणले. त्याला पाहताच संतप्त नागरिकांनी त्याला दगडाने ठेचले. यात गंभीर जखमी झालेल्या शक्तिमानवर मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी त्याचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दील जुगार अड्डा बंद करण्याच्या वादातून रक्तरंजीत संघर्ष झाला.  कौशल्यानगरात शक्तिमानच्या जुगार अड्डय़ाचा स्वयंम नगराळे या तरुणाचा विरोध होता.त्यामुळं शुक्रवारी रात्री शक्तिमाननं त्याच्या काही साथीदारांसह स्वयंमची हत्या केली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. यातील आरोपी शक्तिमानही भांडे प्लॉट येथे त्याच्या मामाच्या घरी पळून जात लपला होता. स्वयंमच्या मृत्यूनंतर संतप्त असलेले नागरिक आणि स्वयंमचे मित्र यांना शक्तिमान  त्याच्या मामाच्या घरी लपून बसल्याची माहिती मिळाली.


स्वयंमच्या मित्रांनी त्याला मामाच्या घरून पुन्हा कौशल्या नगरात आणले. तिथे शक्तिमानला पाहताच त्याच्यावर रोष असलेल्या नागरिकांचा उद्रेक झाला.  नागरिकांनी त्याला दगडाने ठेचले.जमावाच्या या हल्ल्यात शक्तिमान गंभीर जखमी झाला. त्याचा मेडिकलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. तो व्हेंटिलेटरवरच होता. अखेर दोन दिवसांनंतर शक्तिमानचा मृत्यू झाला.पोलिसांना याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यांना 28 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 


शक्तिमानवर पोलिस बंदोबस्तात अत्यसंस्कार


शक्तीमानच्या मृत्यूनंतर  या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.शक्तिमानचा मृतदेह वस्तीत नेल्यास पुन्हा लोक संतप्त होतील याची धास्ती होती.त्यामुळं कडक पोलीस बंदोबस्तात त्याचा मृतदेह मेडिकलमधून मोक्षधाममध्ये नेण्यात आला आणि अत्यसंसस्कार करण्यात आला.