Sharad Pawar Vs Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रावादी पक्षात पडले आहेत.  राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाले आहे. तर, शरद पवार यांना नव्याने पक्ष बांधणी करवी लागत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच अनेकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले. अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार अशी चर्या नेहमीच केली जातो. एकत्र येण्याबाबत प्रतिक्रिया देताना  शरद पवारांबाबत अजित पवार यांनी मोठं विधान केले आहे. 


शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात. मात्र, शरद पवारांबाबत अजित पवारांनी मोठं विधान केल आहे. लोकांना असं वाटतं हे कधीतरी एकत्र येतील का? मात्र, आता फाटी पडलीय ते एका टोकाला आणि आपण एका टोकाला आहोत असं म्हणत शरद पवारांसोबत पुन्हा एकत्र न येण्यावर अजित पवारांनी भाष्य केले. 


अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर राहिलेली नाही - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका


विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जोरदार टीका केली. अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर राहिलेली नाही. भाजपच्या खुंटीला बांधले गेलेत.. त्यांच्या दयेवर जगणारे हे निशाचर प्राणी आहेत असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केल आहे.  


अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट


शिरूर मतदारसंघात अजित पवारांनी कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजबिंडा दिसतो, मिशीवर ताव मारतो, असं म्हणत बटण दाबता मात्र राजकारण हा कोल्हेंचा पिंड नाही. सेलिब्रिटींना तिकीट देणं ही आमची चूक होते, असं अजित पवारांनी शिरूरच्या सभेत म्हटलंय. तर अजित पवारांनी जी उदाहरणं दिली, त्यापैकी एकाही सेलिब्रिटी खासदाराला संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही, असं उत्तर अमोल कोल्हेंनी दिले.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यानंतर खासदार अमोल कोल्हेंनी जोरदार पलटवार केला. मला पक्षात घेण्यासाठी अजित पवारांनी दहावेळा निरोप पाठवल्याचा गौप्यस्फोट कोल्हेंनी केला. मला निवडून आणून चूक केली तर लपूनछपून भेटीगाठी घेण्याचं कारण काय? असा सवालही त्यांनी केला.