पुणे : 'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौक येथील उड्डाण पूलाचं भूमीपूजन करण्यात आलं त्यावेळी गडकरींनी सरकारी लालफितीवर कोरडे ओढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अढळराव पाटील, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट आणि महापौर मुक्ता टिळक यावेळी उपस्थित होते.