Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम आदानी यांच्या भेटीवर टीका केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या हस्ते उदघाटन पार पडलं. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केलाय. गुजरातमध्ये गौतम अदानींनी नवा पॉवरप्लँट सुरू केलाय. याच पॉवरप्लांटचं उदघाटन पवारांनी केले. 


वंचित बहुजन आघाडीचा गौतम अदानी - शरद पवार भेटीवर कॉंग्रेसला टोला


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते शरद पवार आणि उद्योजक गौतम अदानी यांच्या आजच्या भेटीवर वंचित बहुजन आघाडीने ट्वीट करत टोला लगावला आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे सातत्याने गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधावर बोलत असतात. देशातील अनेक उद्योक अदानी समूहाच्या घशात टाकल्यामुळे मोदी सरकारवर वंंचित बहुजन आघाडी आणि विरोधकांकडून सातत्याने टीका होत असते. याच संदर्भात ट्विट करत वंचित बहुजन आघाडीने टीका केली आहे.  राष्ट्रवादी ही भाजपची बी-टीम आहे का? प्रिय काँग्रेस, तुमच्या आवडत्या मित्राबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आमचे नेते प्रकाश आंबेडकर जेव्हा दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिमांच्या प्रश्नांवर काँग्रेसच्या बोटचेपी भूमिकेवर टीका करतात, तेव्हा तुम्ही आमच्यावर टीका करतात असे ट्विट वंचित बहुजन आघाडीने केले आहे.


राष्ट्रवादीला भाजपची बी-टीम म्हणणार नाहीत का?


आज तुमचे आवडते मित्र (शरद पवार) आनंदाने त्यांचे नातेसंबंध एका देश लुटणाऱ्या भांडवलदाराशी शेअर करत आहे, ज्याच्या विरोधात तुम्ही प्रचार करतायेत. तुमचा आयटी सेल आता शरद पवारांना ट्रोल करणार नाही का किंवा तुमचे नेते राष्ट्रवादीला भाजपची बी-टीम म्हणणार नाहीत का? तुम्हाला पाठीचा कणा आहे का? किंवा तुमचे सर्व राजकारण दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांच्या स्वतंत्र आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांवर हल्ला करण्यासाठी राखून ठेवलेले आहे, असं म्हटलं आहे.


सुजात आंबेडकर यांचे  कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनीही ट्वीट करत याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी असती, तर त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसला भाजपची बी-टीम म्हटले असते किंवा, हे केले असते असं म्हणत राहुल गांधी यांचा संसदेतील फोटो शेअर करत कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.