शरद पवार हॉस्पीटलमधून थेट स्पॉटवर; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन
चाणक्ष राजकारणी, तल्लख बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा, दांडगा जनसंपर्क आदी कारणांमुळे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अविश्वसनीय प्रयोग केले आणि ते यशस्वी देखील करुन दाखवले.
Maharashtra Politics, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(NCP president Sharad Pawar ) यांची राजकीय कारकिर्द अत्यंत लक्षवेधी आहे. महाराष्ट्राचं राजकारण(Maharashtra Politics) त्यांच्याभोवतीच फिरत आलं आहे. शरद पवार नेहमीच त्यांच्या कृतीतून दाखवून देतात. मग ते भर पावसात केलेले भाषण असो की रॅली, बैठका की सभा. शरद पवार नेहमीच न थकता सदैव काम करत असतात. कधीच त्यांनी तब्येतची कारण देखील दिले नाही. आज देखील शरद पवार यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध करुन दाखवले आहे. शरद पवार हॉस्पीटमधून थेट राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात पोहचले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले. यामुळेच शरद पवार सर्वांसाठीच ऊर्जा स्त्रोत बनले आहेत(Latest Political Update).
शरद पवार यांच्यावर मागील काही दिवसांपासून मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालायात उपचार सुरु होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालायात दाखल करण्यात आले होते.
मात्र, शरद पवार आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालायातून थेट शिर्डी येथे सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात सहभागी झाले. प्रकृती ठीक नसताना स्वत: शिबीरात सहभागी होत देखील शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
शिर्डीत राष्ट्रवादी पक्षातर्फे दोन दिवसीय मंथन शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबीराचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस होता. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच शरद पवार थेट शिर्डीत दाखल झाले. राष्ट्रवादीच्या मंथन शिबीराचा समारोप शरद पवारांच्या मार्गदर्शनाने झाला.
शिबीर संपताच शरद पवार पुन्हा मुंबईकड रवाना झाले. यावेळी शरद पवार हेलिकॉप्टमध्ये बसल्यानंतर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांना निरोप दिला.
शरद पवारांची पक्षाप्रती असलेली कर्तव्य दक्षता पुन्हा एकदा त्यांच्या कृतीतून सिद्ध झाली आहे. वयाच्या 81 व्या वर्षी देखील प्रकृतीचे कारण न देता जबाबदारीने त्यांनी आपल्या कामाची चुणुक दाखवली आहे. शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपला वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
चाणक्ष राजकारणी, तल्लख बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा, दांडगा जनसंपर्क आदी कारणांमुळे शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अविश्वसनीय प्रयोग केले आणि ते यशस्वी देखील करुन दाखवले. हातात सत्ता असो अथवा नसो शरद पवार फॅक्टर नेहमीच महाराष्ट्राच्या राजकाणात लक्षवेधी ठरलाय.