शरद पवार घेणार नारायण राणेंची भेट, राजकीय चर्चांना उधाण
पवार सध्या सिंधुदूर्ग दौऱ्यावर असून राणेंच्या घरी जाणार आहेत.
सिंधुदुर्ग : कोकणाच्या आणि राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी आगमी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडण्याची शक्यता आहे. काँग्रेस सोडून गेलेला नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी झी २४तासनं दिली होती. या बातमीला आज दुजोरा मिळताना दिसतोय. सिंधुदुर्गातील बडे नेते नारायण राणे यांच्या कणकवलीतल्या निवासस्थानी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाहुणचारासाठी जात आहेत. पवार सध्या सिंधुदूर्ग दौऱ्यावर आहेत. यानिमित्तानं पवार राणेंच्या घरी जाणार आहेत.
राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार
सदिच्छा भेट असं याला नाव देण्यात आलं असलं तरी यातून वेगळी समीकरणं तयार होत आहेत का अशी चर्चा आहे.
यामागे दोन महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. पहिली म्हणजे निलेश राणे लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या तिकीटासाठी उत्सुक आहेत.
तर दुसरीकडे या मतदारसंघात राष्ट्रवादीकडे तगडा उमेदवार असल्याचा दावा राष्ट्रवादीनं म्हटलंय. काँग्रेससोबत झालेल्या जागावाटपाच्या बैठकीत राष्ट्रवादीनं केला होता. या राजकीय पार्श्वभूमीवर होणारी आजची पवार-राणेंची भेटीला महत्व प्राप्त झालंय.