मुंबई : सेना-ठाकरे गटामध्ये आता दसरा मेळाव्यावरून मोठा वाद रंगला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटातील नेते शिवाजी पार्कवर आमचा मेळावा होणार असल्याचा दावा करत आहेत. त्यामुळे या नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अशातच या वादामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar on Dasara Melava Controversy) यांनी उडी घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेळावे घेण्याचे अधिकार सगळ्यांना आहेत पण त्यातून वाद निर्माण हाेतील अशी भूमिका नसावी. सामाेपचारानं गाेष्टी हाेतील याकडं लक्ष देणे गरजेचं असल्याचा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे. मुख्यमंंत्री हे राज्याचे असतात ते एकापक्षाचे नसतात त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी, असंही पवार यांनी म्हटलं आहे. 


अजित पवार काय म्हणाले?
शिंदे गट आणि ठाकरे गटाने शिवाजी पार्कवरून वाद घालू नये. शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळावा घेत आहेत. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्त्व असतील बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कवरून वाद घालू नये, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. 


दरम्यान, शिवाजी पार्कवर शिंदे गटाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोलावलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्यामुळे आता शिवाजी पार्कवर शिंदे गटाचा दसरा मेळावा होतो की ठाकरे गटाचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.