Samarjit Ghatge In Sharad Pawar Faction : शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या (Sharad Pawar Faction) वतीने कागलमधील गैबी चौकात जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी फुंकत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीतसिंह घाटगे यांनी तुतारी फुंकली. तर शरद पवार यांनी आपल्या भाषणात लाचारी स्वीकारणारांना त्यांची जागा दाखवा, असं म्हणत असं मुश्रीफांना (Hasan Mushrif) लक्ष केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय विद्यापीठ म्हणून कागल विधानसभा मतदारसंघाला ओळखलं जातं. याच विद्यापीठात शरद पवारांचे बोट धरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी तब्बल पाच वेळा निवडणूक जिंकली आहे. या पाचही निवडणुकीत शरद पवारांची साथ मुश्रीफांना फायदेशीर ठरल्याचं पाहायला मिळालं. इतकंच नाही तर मुश्रीफावर ईडीची कारवाई झाल्यानंतर पवारांनी मुश्रीफाना ताकद देत त्यांना मानसिक आधार दिला होता. पण हसन मुश्रीफ अजितदादाच्या सोबत निघून गेल्यानं शरद पवारांनी आज कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकातून हसन मुश्रीफाचा चांगलाच समाचार घेतला.


काय म्हणाले शरद पवार?


घरची महिला स्वाभिमानी बाणा दाखवत होती, पण नेत्याने लाचारी स्वीकारली. त्यामुळे लाचारी स्वीकारणाऱ्या नेत्याला त्याची जागा दाखवा, असं म्हणत पवारांनी हसन मुश्रीफांवर टीका केली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हसन मुश्रीफ यांनी अजित दादांच्या सोबत निघून गेले. पण याच हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेवेळी पवारांना साथ देणाऱ्या खासदार सदाशिवराव मंडलिक यांना देखील पवारांनी बाजूला सारलं आणि अनेक जबाबदाऱ्या दिल्या. पण त्याची जाण हसन मुश्रीफ यांनी ठेवली नाही याची आठवण नेत्यांनी करून दिली. शरद पवार यांनी समरजीत घाटगे यांना आमदार म्हणून निवडून द्या, मी त्याला मंत्री करतो असं, शरद पवारांनी कागलकरांना आश्वासन दिलं आहे.


सरकारमध्ये गेल्यानं संरक्षण मिळेलं, असं अनेकांना वाटलं, पण त्यांच्या लक्षात आलं नाही कायदा कधी बदलत नसतो. गेला तर तुमचा कपाळमोक्ष होईल याची जाणीव मी त्यांना करून दिली होती, असं सांगत मुश्रीफ याची कृती चुकीचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. कोल्हापुरात समतेचा विचार रुचतो, हाच विचार पोहोचवण्यासाठी कागलकरानी धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसलेल्या व्यक्तीला बाजूला सारा, असं सांगत शरद पवार आणि जयंत पाटील यांनी एकेकाळचे सहकारी असणाऱ्या हसन मुश्रीफ याच्यावर जोरदार टीका केलीय.


दरम्यान, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कागल शहर तुतारीमय झालेलं पाहायला मिळालं. कागल विधानसभा मतदारसंघातील लढत ही समरजीतसिह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ अशी नसून स्वाभिमान विरुद्ध लाचारी अशीच असल्याचं शरद पवारांनी अप्रत्यक्ष खडसावून सांगितलं आहे.