Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या कुठंही गेलो तरी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले येऊन भेटत आहेत. एकाने निवडणूक घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आमची आघाडी असून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सध्या येऊन भेटत आहेत. एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यक आहे. सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू असून जयंत पाटील आणि सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील. आमची आघाडी आहे आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तीनही पक्षांना एकवाक्यता साधावी लागणार आहे. पुढच्या 10 दिवसांत हे सगळं संपेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. 


जागावाटपानंतर लोकांच्यात जावं लागेल आणि भूमिका मांडणे सूरू होईल. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस 1 तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. आता 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. याचा अर्थ आम्हाला आशादायक चित्र आहे, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे. 


आरक्षणावर सामंजस्य भूमिका... 


आरक्षणाचे मुद्दे सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढायचं काही कारण नाही. आपण सगळे भारतीय आहोत महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळं सामंजस्य भूमिका जे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारने देखील लोकांना विश्वासात घेऊन चांगलं वातावरण कसं राहील याची खबरदारी घेतली पाहिजे, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.