पुणे : राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं पुणे वेधशाळेतील हवामान तज्ज्ञांचं तोंड गोड झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे वेधशाळेत साखर वाटली. ही साखर पाठवली होती, शरद पवार यांनी तीही थेट बारामती वरून.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेधशाळेनं वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरलाय. हवामान विभागानं वर्तवलेला पावसाचा अंदाज बऱ्याचदा फसतो. त्यावरून शरद पवारांनी हवामान विभागाची फिरकी घेतली होती. अंदाज खरा ठरला तर बारामतीची साखर वाटीन, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यानुसार त्यांनी आपला शब्द पाळला. पुणे वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांनीही मग पवारांनी पाठवलेली साखर खाऊन तोंड गोड केलं.