मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी रात्री उशिरा शिवसेनेचे (Shivsena)धनुष्य-बाण (bow and arrow) हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा (froze) हंगामी आदेश दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट (Eknath Shinde) या दोघांना मोठा धक्का बसला. या निर्णयाबाबत शिवसेना ठाकरे गट (Shivsena) थेट सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दाद मागणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी निवडणूक आयोगाने चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना  नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरला नवीन नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार यांनी भाष्य केलंय.


"हे मी सांगणारा कोण. त्याबाबत उद्धव ठाकरे ठरवतील. उद्या शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) अशी होऊ शकते. काँग्रेसमध्ये दोन भाग झाले तेव्हा काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस स्वर्णसिंग असे होते. त्यामधून आम्ही लढलोय," असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.


पोटनिवडणूकीत काय परिणाम दिसून येतील असे विचारल्यावर शरद पवार म्हणाले, की सत्तेचा गैरवापर करुन निवडणुका कोणी लढवत असेल तर लोकांना त्याबद्दल माहिती आहे.


चिन्ह असो वा नसो निवडणुकीला जायची तयारी ठेवा - शरद पवार


"गुणवत्तेवरुन निर्णय घेतले जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाटत होतं ते घडलं. असे घडेल असं माझं मन सांगत होतं. एखादी शक्तीशाली संघटना ते ठरवेल त्या निवडणूक चिन्हांवर जिंकेल असं सांगता येत नाही. त्यामुळे चिन्ह असो वा नसो निवडणुकीला जायची तयारी ठेवली पाहिजे. नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची हा शिवसेनेसमोरील पर्याय आहे. मी स्वतः वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढलो आहे आणि त्याचा काही परिणाम होत नाही," असे शरद पवार यांनी म्हटलं.