Sharad Pawar On Reservation : महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पेटलाय.. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी वारंवार या मागणीसाठी आंदोलन केलंय. तर दुसरीकडे धनगर समाजाकडून त्यांना एसटीमधून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन सुरु आहे... मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या जरांगेंच्या मागणीला ओबीसी समाजाने विरोध केलाय..  तर दुसरीकडे धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देऊ नये यासाठी सत्ताधारी आणि आदिवासी आमदारच आंदोलनाला बसले.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे राज्यात आरक्षणाच्या प्रश्नावरुन मोठा तिढा निर्माण झालाय. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेलं असतानाच आता शरद पवारांनीच फॉर्म्युला सांगितलाय. 50 टक्क्यांच्यावर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती करावी लागेल. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे. जावूया 75 टक्क्यांपर्यंत. तमिळनाडूत 78 टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे. मग महाराष्ट्रात 75 टक्के आरक्षण का शक्य होणार नाही? महाराष्ट्रात 75 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यासाठी केंद्राने विधेयक आणावं अशी मागणीही शरद पवारांनी केलीय. केंद्र सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा. संसदेत दुरुस्ती विधेयक आणावं. आम्ही त्याला पाठिंबा देऊ.. आम्ही सर्व लोक त्यांच्या बाजूने उभं राहू.. मतदान करु त्यांना साथ देऊ.


हे देखील वाचा...महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक प्रयोग? एमआयएमचा 28 जगांचा प्रस्ताव; शरद पवार म्हणाले...


मात्र जरांगेंनी शरद पवारांच्या या मागणीला विरोध केलाय.. निवडणूक लागायच्या आत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीय.पवारांनी आरक्षण मर्यादा वाढवण्याची मागणी केल्यानंतर आता त्यावरुन राजकारण सुरु झालंय..महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार आहे.. मात्र त्याआधी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापतोय..