कोल्हापूर : साखरेचे दर आणि साखर उद्योग अडचणीत आल्यानं त्यावर तोडगा काढण्यासाठी आता शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. त्यानंतर आज दिल्लीत तोडगा काढण्यासाठी बैठक होणार आहे. देशात तयार होणाऱ्या एकूण साखरेपैकी 35 % साखर खाण्यासाठी वापरली जाते. उरलेली खासगी कंपन्यांना मिळते. या उरलेल्या 65% साखरेवर कर लावण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज कोल्हापूरमध्ये पवारांनी पत्रकारपरिषद घेऊन ही माहिती दिली. आगमी निवडणूकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्याचे संकेतही पवारांनी यावेळी दिले. देशातील शेतक-यांची परिस्थिती बिकट आहे. परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांची नावं लिहून आत्महत्या करत आहेत.यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज असल्याचंही पवारांनी म्हटलं आहे.


पाहा काय बोलले शरद पवार