मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना ३०० घरे देण्यात येणार असल्याचं घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेला भाजप आणि मनसेने विरोध केला होता. तसेच, यावरून मुख्यमनातरी उद्धव ठाकरे हे सोशल माध्यमांवर ट्रोलही झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याकडे असलेल्या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेतून ही घरे देण्यात येणार होती. या निर्णयाला सामान्यांनी विरोध सुरु करताच ही घरे फुकट देणार नसल्याचे मंत्री आव्हाड यांनी स्पष्ट केले.


त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांच्या घरांबाबत पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिलीय. महाविकास आघाडीने आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाला शरद पवार यांचा विरोध केलाय. 


गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. मात्र, ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन घर दिली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले आहेत.


याबाबत  शरद पवार स्वतः पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. गृह निर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी निर्णय धेतला होता. त्याला सीएम ठाकरे यांनी समर्थन दिले होते. पण, आता पवार यांनीच या निर्णयाला विरोध केला आहे.